श्रुतिगंध वेदपाठशाळा, बीड.येथे आद्य श्रीशंकराचार्य जयंती उत्सव पुरोहितांच्या सहभागासह उत्साहात साजरा
दिनांक ०६ मे २०२२ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे श्रुतिगंध वेदपाठशाळेत यंदाचे वर्षी आद्य श्रीशंकराचार्य जयंतीनिमित्त ; आचार्यांच्या प्रतिमेचे पूजन, आचार्य चरित्र, उपस्थितांचे मनोगत इत्यादींसह जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात यंदाचे वर्षी पुरोहितांनी देखील सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे वे.मू. श्रीकृष्ण रामदासी यांनी समयोचित प्रास्ताविक केले. ह.भ.प.श्री. एकनाथमहाराज पुजारी यांनी आचार्य प्रतिमेचे पूजन करून आपल्या खास शैली मध्ये मनोगत व्यक्त केले. वे.मू.अमोलशास्त्री जोशी यांनी आचार्यांचे चरित्र आणि प्रबोधनपर विचार ठेवून कार्यसमारोप केला. वे.मू. प्रल्हाद जवळेकर गुरुजींनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी पुरोहितांपैकी सर्वश्री वेदमूर्ती सुरेश भोगे गुरुजी,श्रीपाद विडेकर, राहुल जोशी,श्रीकांत ठोसर, राजुदेवा जोशी, विशाल कुलकर्णी, विजयकुमार मुळे,वैभव जोशी यांचेसह अनेक पुरोहित ;तसेच ब्राह्मण महासंघाचे चंद्रकांत जोशी,संजय कुलकर्णी, बाळासाहेब जोशी खडकीकर, तसेच संतोष जोशी,बाळासाहेब देशमुख, राजाराम जोशी, हणमंतराव कुलकर्णी,दिनकर कुलकर्णी, तन्मय देशपांडे, डॉ.आनंद कुलकर्णी,मंगेश कुलकर्णी,सुनील कुलकर्णी, सौ.जोशीकाकू,सौ. कुलकर्णी, सौ.तेजश्री धर्माधिकारी यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रसादादी वाटपांसह कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.