मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवर येत्या दोन दिवसात सुनावणी होणार असल्याने केवळ चार दिवस कोठडीत वाढ केली आहे.त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सुप्रीम कोर्टाकडे लागल्या आहेत.
ईडीने केलेल्या कारवाईत मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत .ही न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं नवाब मलिक यांना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
त्यामुळं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून न देता त्यांना फक्त ४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळं २२ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.