पुणे – मस्जिद वरील भोंग्याच्या विषयावरून राजकिय वर्तुळात चर्चेत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जूनमध्ये अयोध्येला जाण्याची घोषणा केली.राज यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या विषयावर आपली भूमिका मांडली.
2 एप्रिल रोजी गुढीपाडवा निमित्ताने आयोजित सभेत राज ठाकरेंनी मस्जिद वरील भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
राज यांनी पुण्यात रविवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला.राज म्हणाले की,राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार, 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार,भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिमांनाही होतो,भोंग्यांचा विषय धार्मिक नाही तर सामाजिक आहे,त्यांनी जर पाचवेळा भोंगा लाऊन अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणू असा इशारा दिला.
सर्व मशिदीवरील भोंगे अनधिकृत आहेत तर आमच्याच कार्यकर्त्यांचे भोंगे का काढले जात आहेत.एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितला. आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल तर गप्प बसणार नाही, देशभरातील सर्व हिंदु बांधवांनी तयार राहावं.आमच्या हातात शस्त्रे घ्यायला भाग पाडू नका.जर यांना देशाचा कायदा आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल .महाराष्ट्रातील शांतता भंग करायची नाही पण भोंगे बंद करा अशी मागणी राज यांनी केली.