मुंबई – प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी बुधवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खा प्रीतम मुंडे या दाखल झाल्या.धनंजय यांना हृदयविकाराचा त्रास नसून भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते बाहेर येतील अशी माहिती त्यांनी दिली.
धनंजय मुंडे यांना मंगळवारी सायंकाळी भोवळ आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. त्यांना हृदयविकार चा त्रास झाल्याचे माध्यमातून समजले.रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे हे रुग्णालयात होते तर सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली.सुप्रिया सुळे,भूजबळ ,मंत्री राजेंद्र शिंगणे,महापौर किशोर पेडणेकर राज्यमंत्री राजेंद्र यद्रावकर,राज्यमंत्री विश्वजीत कदम,आमदार विक्रम काळे,आमदार विनायक मेटे,आमदार बाळासाहेब आजबे,आमदार किरण सरनाईक,आमदार संजय दौड
यांनी मुंडे यांची भेट घेतली.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकृती अस्वाथ्यामुळे दवाखान्यात भर्ती आहेत. त्यांना भेटायला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे पोहोचल्या. त्यांनी धनंजय मुंडेंची बराच वेळ भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. भावाची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला ही चुकीची बातमी आहे. त्यांना भोवळ आली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विकनेस आला होता. आता त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. आता ते व्यवस्थित आहेत. आम्ही त्यांना भेटलो आणि बोललो, ते रिकव्हर होत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.