मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.देशमुख यांचा ताबा सीबीआय ने घेतला आहे.त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे.
१०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. केंद्रीय संस्थेने त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. याबाबत देशमुखांचे वकील दुपारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यापुढे पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या कस्टडीला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिलं होत. सीबीआय आता देशमुख यांना सीबीआय कोर्टात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या सचिन वाझे याने देशमुख यांच्या वसुली बाबतचा गौप्यस्फोट केल्यानंतर डिसेंम्बर 2020 मध्ये देशमुख आणि त्यांच्या मुलांविरुद्ध कारवाईस सुरवात झाली होती.त्यानंतर देशमुख यांना अटक झाली.या सगळ्या विरोधात देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागितली होती.
दरम्यान आता त्यांचा ताबा सीबीआय ने घेतल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होणार हे निश्चित आहे.