December 10, 2022

खा संजय राऊत यांची संपत्ती जप्त !

खा संजय राऊत यांची संपत्ती जप्त !

मुंबई – शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते खा संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबई येथील संपत्ती सक्त वसुली संचालनालयाने जप्त केली आहे.ईडी च्या या कारवाईने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशा कारवायांना मी घाबरत नाही अस म्हणत राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे तर भाजपचे माजी खा किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेला टार्गेट केले आहे.

ईडीने संजय राऊत यांची जी संपत्ती जप्त केली त्यामध्ये दादर याठिकाणी असणारा एक फ्लॅट तर अलिबागमध्ये असणाऱ्या 8 जागा आहेत. प्रविण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती एजन्सीने दिली आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मला असं वाटतं की संजय राऊत यांना असं काहीतरी होईल याची चाहूल लागली होती. त्यामुळे गेले काही दिवस त्यांची नौंटकी सुरू होती’, अशा शब्दात सोमय्या यांनी राऊतांना लक्ष्य केले आहे.  दरम्यान संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे देखील वळवला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांना यांना जाब विचारायला हवा. उद्धव ठाकरेंना असे वाटत की ते माफिया सेनेचे माफिया सरकार आहेत. या प्रकरणात गृहमंत्री यांनी माहिती घेतली पाहिजे असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click