बीड- शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील तब्बल 338 शिक्षक बोगस असल्याचे समोर आले आहे.राज्यातील 7800 पेक्षा जास्त शिक्षक हे बोगस असल्याचे उघड झाले आहे.
चार पाच महिन्यांपूर्वी राज्यात आरोग्य विभागाच्या घोटाळ्याचा तपास करताना टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यांतर्या प्रकरणात राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक झाली होती.
टीईटी परीक्षा आणि म्हाडा च्या परीक्षा घेणाऱ्या जीएस टेक्नॉलॉजी या संस्थेच्या प्रितेश देशमुख सह अनेक जणांना या परीक्षा घोटाळ्यात अटक झाल्याने सरकारने 2017 पासून ही परीक्षा दिलेल्या अन नोकरीला लागलेल्या शिक्षकांची माहिती गोळा केली होती.
जिल्ह्या जिल्ह्यातून माहिती प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने या टीईटी प्रमानपत्रांची तपासणी केली त्यात धक्कादायक वास्तव समोर आले आहे.राज्यातील तब्बल 7880 शिक्षक बोगस असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 338 शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा निहाय बोगस शिक्षक किती आहेत पहा मुंबई दक्षिण – 40,मुंबई पश्चिम – 63,मुंबई उत्तर – 60,रायगड – 42,ठाणे – 557,पालघर – 176,पुणे -395,अहमदनगर – 149,सोलापूर – 171,नाशिक – 1154,धुळे – 1002,जळगाव – 614,नंदुरबार – 808,कोल्हापूर – 126,सातारा – 58रत्नागिरी – 37,सिंधुदुर्ग – 22,औरंगाबाद – 458,जालना – 114,बीड – 338,परभणी – 163,हिंगोली – 43,अमरावती – 173,बुलढाणा – 340,अकोला – 143,वाशिम – 80,यवतमाळ – 70,नागपूर – 52,भंडारा – 15,गोंदिया – 09,वर्धा – 16,चंद्रपूर – 10,गडचिरोली – 10,लातूर – 157,उस्मानाबाद – 46,नांदेड – 259.