मुंबई – राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी विधिमंडळात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाची चौकशी सीबीआय ऐवजी सीआयडी मार्फत केली जाईल असे सांगत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोप झालेले वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती विधिमंडळात दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या पेन ड्राइव्ह बॉम्ब चे हादरे सोमवारी विधीमंडळात बसले.राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात नेमकी काय सत्यता आहे ती तपासून पहिली जाईल असे सांगितले.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की,हे प्रकरण गंभीर आहे,पेन ड्राइव्ह प्रकरणात आरोप झालेले ऍड प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून तो सरकारने मंजूर केला आहे.या सर्व प्रकरणाची चौकशी आणि तपास हा सीआयडी मार्फत केली जाईल असेही त्यांनी घोषित केले.
त्याचसोबत भाई हिराचंद रायसोनी पतसंस्थेत जो भ्रष्टाचार झाला त्याची देखील चौकशी केली जाईल असे गृहमंत्री यांनी जाहीर केले.