नवी दिल्ली – अस्ट्रोलिया चा महान फिरकीपटू शेन वोर्न चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.भारताचा आघाडीचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.या वृत्ताने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.
आपल्या फिरकीच्या जादूवर भल्या भल्या क्रिकेट पटु ची दांडी गुल करणाऱ्या शेन वोर्न च्या निधनाचे वृत्त आल्यानंतर क्रिकेट सह क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.क्रिकेट विश्वात अस्ट्रोलिया चा जो काही दबदबा होता त्यात शेन चे योगदान मोलाचे होते.
कसोटी,एकदिवसीय क्रिकेट मध्ये शेन ने शेकडो फलंदाज बाद केले आहेत.भारत आणि भारतीय क्रीडा प्रेमींसोबत शेन ची वेगळी जवळीक होती.विशेषतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी त्याच्या दोस्तीचे अनेक किस्से आजही सांगितले जातात.
या दुःखद बातमीने क्रीडा प्रेमी वर शोककळा पसरली आहे.