बीड – गेल्या अनेक महिन्यापासून लांबलेल्या राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे प्रभाग रचना आणि मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून दहा मार्च पासून एक एप्रिल पर्यंत हा सर्व कार्यक्रम पार पडणार आहे म्हणजेच एप्रिलच्या अखेरीस नगरपालिकेचे नगारे वाजण्याचे निश्चित आहे त्यामुळे सर्व इच्छुक भावी नगरसेवकांनी कामाला लागायला हरकत नाही
राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2022 पर्यंत ज्या नगरपालिकांच्या मुदती संपत आहेत त्यांच्या प्रभाग रचनेची अंतिम यादी दहा मार्च पासून करण्याचे आदेश दिले आहेत दहा मार्च ते 1 एप्रिल दरम्यान हा कार्यक्रम संबंधित जिल्हाधिकारी यांनी फायनल करावा त्यानंतर 1 एप्रिल ला निवडणूक आयोग प्रभाग रचना जाहीर करेल असे आदेशात म्हटले आहे
बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका सह राज्यातील 100 पेक्षा अधिक नगरपालिकांच्या मुदती नोव्हेंबरमध्येच संपल्या आहेत सध्या या नगरपालिकांवर प्रशासक काम पाहत आहेत बहुतांश ठिकाणी निवडणूक कधी होणार याची चर्चा सुरू असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका होणार की नाही हे अनिश्चित असताना निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याच्या आदेश दिल्याने भावी नगरसेवक कामाला लागले आहेत
एक एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम रूप प्राप्त झाल्यानंतर 15 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले असून पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र राज्यात दिसण्याची शक्यता आहे