July 7, 2022

जलयुक्त शिवार घोटाळा ! तीन जणांना अटक !!

जलयुक्त शिवार घोटाळा ! तीन जणांना अटक !!

बीड – बीड जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यात तीन जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. काँगेस चे वसंत मुंडे यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. आता यात सेवानिवृत्त झालेल्या कृषी सहायकांना अटक झाल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.

जलयुक्त शिवारच्या कामात अनियमितता आणि गैरप्रकार याचा तपास करण्यासाठी पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली होती. या पथकाने 15 टक्के कामाची निवड तपासणीसाठी केली होती. तसेच एकूण 815 कामांपैकी 123 कामे निवडण्यात आली होती. त्यापैकी 103 कामांची तपासणी झाली ज्यात 95 कामांमध्ये अनियमितता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या कामांमध्ये नव्वद लाख रुपयाच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांन नोटीस देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 62 कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचार्‍यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे

बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते या आदेशा सोबतच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरू केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click