April 1, 2023

पोलीस भरतीमध्ये घोटाळा ! बीडच्या तिघांसह दहा जणांना अटक !!

पोलीस भरतीमध्ये घोटाळा ! बीडच्या तिघांसह दहा जणांना अटक !!


बीड – टीईटी, आरोग्य विभाग,म्हाडा नंतर आता पोलीस भरती मध्ये देखील बीडच्या काही लोकांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.डमी उमेदवार म्हणून तीन वेळा परीक्षा देणाऱ्या सह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकाराने खळबळ उडाली आहे.अटक केलेल्या आरोपीमध्ये तिघेजण बीडमधील असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्युज ला दिली.

आता पोलिस भरतीमध्ये देखील बीडच्या महाठगांनी प्रताप करून दाखवला आहे. पैशासाठी काहीही करणारे लोक बीडची अजून किती बदनामी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्थेचा इन्स्ट्र्नटर गणेश पवार याने मुंबईतील भोईवाडी येथील पोलिस भरती परीक्षेत तीनपेक्षा अधिक उमेदवारांच्या जागेवर डमी उमेदवार म्हणून उभा राहिला असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यासह दहा जणांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे.


मुंबई पोलीस भरती परीक्षेला डमी उमेदवार बसल्याप्रकरणी बीड येथील एका प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गणेश पवार, हा किमान तीन उमेदवारांच्या ऐवजी चाचणीसाठी हजर राहिल्याचा आरोप आहे. त्याला ग्राउंड चाचण्यांमध्ये 50 पैकी 49 गुण मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल केले असून पवारसह 11 जणांना अटक केली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेल्या डमी उमेदवाराच्या पहिल्या प्रकरणात पवार यांचे नाव समोर आले होते.


त्यानंतर आणखी दोन प्रकरणात हा डमी उमेदवार म्हणून हजर झाला होता. मात्र त्यावेळी तो सापडला नाही. आता पोलिसांनी त्याला सोमवारी जेरबंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार याने रवी शेळकेसोबत बीड येथे प्रशिक्षण संस्था स्थापन केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रवीचा मृत्यू झाला. गणेश पवार हा याठिकाणी एक प्रशिक्षक आहे आणि उमेदवारांना मैदानी चाचणीबद्दल तो प्रशिक्षण देतो. यामध्ये उमेदवारांना कसे धावायचे आणि कसे चांगले गुण मिळवायचे याबद्दल शिकवले जाते.

ज्या उमेदवारांना मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवण्याचा आत्मविश्वास नसतो, त्यांच्या जागी गणेश चाचण्यांसाठी हजार राहतो. यासाठी तो 3 लाख रुपये आकारतो. ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षेत 50 पैकी 40-42 गुण मिळवले आणि ग्राउंड टेस्टमध्ये चांगले गुण मिळवण्याची खात्री नाही, अशा लोकांसाठी गणेश डमी उमेदवार म्हणून हजर राहत होता. तीन उमेदवारांऐवजी पवार अशा चाचण्यांना हजार राहिला आणि त्याने 50 पैकी 49 गुण मिळवले. भोईवाडा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र पवार यांनी न्यूज अँड व्युज ला सांगितले की, आम्ही पवार याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या 1076 कॉन्स्टेबल पदासाठी 14 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा तर डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ग्राऊंड घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी 1.09 लाख उमेदवार उपस्थित होते त्यापैकी टॉप 10,760 उमेदवारांना ग्राउंड टेस्टसाठी बोलावण्यात आले होते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी लेखी चाचणी आणि ग्राउंड चाचण्यांचे व्हिडीओ शूट करण्यात आले होते.

1076 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर, एक विशेष टीम तयार करण्यात आली, ज्यांनी सर्व अंतिम उमेदवारांची छाननी केली आणि जे संशयास्पद आढळले त्यांना बोलावले. पोलिसांनी अशा तरुणांना फसवणूक आणि गुन्हेगारी कट प्रकरणी अटक केली. बाळनाथ पवार (30), सतीश मोरे (22), भगवान टकले (24), विकास साळुंखे (28), कुंडलिक शिंदे (25), प्रवीण शिंदे (32), ज्ञानेश्वर घोडके (24) आणि आकाश कव्हळे (23) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दोन डमी उमेदवारांसह अटक करण्यात आली आहे. सर्व उमेदवार आणि डमी हे जालना, बीड, औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click