December 10, 2022

वडवणीत राष्ट्रवादी, केज आघाडी तर शिरूर, आष्टी ,पाटोदा मध्ये भाजप !

वडवणीत राष्ट्रवादी, केज आघाडी तर शिरूर, आष्टी ,पाटोदा मध्ये भाजप !

बीड- नगर पंचायत च्या नगराध्यक्ष आणि उपाध्यकक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी,पाटोदा शिरूर मध्ये भाजप ने बाजी मारली.प्रतिष्ठित अशा वडवणी मध्ये भाजप चे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी ने बाजी मारली .

बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायत साठी मागील महिन्यात निवडणूक झाली.यामध्ये तीन नगर पंचायत वर भाजपने तर केजमध्ये जनविकास आघाडी ने आणि वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती.

सोमवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली त्यात आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांची बिनविरोध निवड तरउपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली.पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड तर उपनगराध्यक्षपदी शरद बांमदळे यांची निवड झाली.

शिरूरकासार नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.प्रतिभाताई रोहिदास गाडेकर यांची निवड उपनगराध्यक्षपदी श्वेता प्रकाश देसरडा यांची निवड झाली.केज नगराध्यक्ष पदी सीताबाई बन्सोड आणि उपाध्यक्ष पदी शीतल पशुपतीनाथ दांगट यांची बिनविरोध निवड झाली.

प्रतिष्ठित अशा वडवणी नगर पंचायत मध्ये चुरस होईल अशी शक्यता होती.मात्र सोमवारी भाजपचे आठ सदस्य गैरहजर राहिल्याने सौ वंदना शेषेराव जगताप यांची अध्यक्षपदी आणि बन्सी मुंडे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click