May 26, 2022

तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना केले पात्र !

तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना केले पात्र !

पुणे – टीईटी गैरव्यवहार प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर नवी मगिती उजेडात आली आहे. 2018 – 19 मध्ये तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.यामध्ये अटक केलेले शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र होते. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

२०१९-२० च्या टीईटी परीक्षेतील पहिल्या पेपरला १ लाख ८८ हजार ६८८ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १० हजार ४८७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. तर, पेपर २ साठी १ लाख ५४ हजार ५९६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार १०५ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. हा निकाल १९ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता.

याचप्रमाणे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत ९ हजार ६७७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. या परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअरचे अश्विनकुमार व इतरांना अटक केली आहे. या परीक्षा मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे. यामध्येही प्राथमिक माहितीनुसार सुमारे अपात्र ५०० परीक्षार्थींचे प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेऊन त्यांना मूळ निकालात घुसवून पात्र असल्याचे दाखविले आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click