March 22, 2023

टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक !

टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक !

पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता थेट वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. परभणी,नांदेड येथील कामामुळे राज्यात वादग्रस्त ठरलेले अधिकारी सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.खोडवेकर हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

२०१९ डिसेंबर २०२० कालावधीत खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या खोडवेकर हे कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

टीईटी घोटाळ्यात पोलिसांनी आजपर्यंत अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे,मात्र उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.खोडवेकर हे नांदेड येथे कार्यरत असताना वादग्रस्त ठरले होते.त्यावेळी त्यांची बदली परभणी ला झाल्यानंतर शिवसेनेने महापालिके समोर फटाके वाजवून आनंद साजरा केला होता.

खोडवेकर हे सुपे यांच्यासोबत कार्यरत असताना त्यांनी अनेक उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पास केल्याचे यामुळे उघड होणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click