February 8, 2023

एमपीएससी ने कोणती परीक्षा पुढे ढकलली !

एमपीएससी ने कोणती परीक्षा पुढे ढकलली !

 मुंबई – एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकरणात विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.५ आणि १२ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे.

एमपीएससी आयोगाने ट्विट करत परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती दिली , काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ एसपीएससी आयोगावर आली आहे. गेल्या काही महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे पाहिलं आहे. यावरून विद्यार्थी अनेकदा आक्रमकही होतात. कोरोनामुळेही अनेकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते.

एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर येत्या २ फेब्रुवारीला सुनवाणी होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे याचिकार्ते तसेच इतर विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे. ही सुनवणी पूर्व परीक्षा गट ब यासाठी असणार आहे. या मुख्य परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली आहे, आम्हालाही मुख्य परीक्षेला बसू देण्यात यावं अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

एसपीएससी आयोगाने पूर्व परीक्षेतील तीन प्रश्न रद्द केल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे, असे मत विद्यार्थ्यांनी कोर्टात मांडले आहे. यामुळे आमचे नुकसान झाले आहे, आयोगाच्या प्रश्न रद्द करण्यामुळे आम्हाला मुख्य परीक्षेला बसता येत नाही, तर न्यायालयाने आम्हाला मुख्य परीक्षेला बसण्याची परवागी द्यावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी न्यायलायत लढा सुरू केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click