बीड – जिल्ह्यातील पाच नगर पंचायत पैकी आष्टी,पाटोदा आणि शिरूर या तिन्ही मध्ये महिला नगराध्यक्ष होणार आहे,तर केजमध्ये अनुसूचित जाती अन वडवणी मध्ये सर्वसाधारण साठी आरक्षण जाहीर झाले आहे,त्यामुळे आ सुरेश धस यांच्या मतदारसंघात आता महिला राज असणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या राज्यातील नगर पंचायत च्या निवडणुकीत भाजप एक नंबर चा पक्ष झाला .बीड जिल्ह्यात तीन नगर पंचायत भाजपच्या ताब्यात तर एक अपक्षांच्या अन वडवणी नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली.
या नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी आरक्षण जाहीर झाली.त्यामध्ये आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तिन्ही नगरपंचायतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला साठी ,केज —- SC सर्वसाधारण व वडवणी — सर्वसाधारण साठी जाहीर झाले आहे.
पुढील महिन्यात नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे,त्यामुळे आता या पाच ठिकाणी कोण नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.