मुंबई – जागतिक पातळीवर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्वल करणारे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा रजेचा राज थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच मंजूर केला आहे.डिसले यांच्या अर्जावर सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत हा अर्ज चौकशीसाठी ठेवला होता.या प्रकरणी मिडियामधून टीका झाल्यानंतर आता मंत्रालयातून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
आपल्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे देशातच नव्हे तर विदेशात डंका निर्माण केलेले सोलापूर जिल्ह्यातील परतवाडी शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर अवार्ड जाहीर झाला होता.त्यानंतर त्यांचे देशातून कौतुक झाले होते.
डिसले गुरुजी यांना पुढील सहा महिने प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे.त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता.मात्र त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी काय काम केले असा सवाल उपस्थित करून शिक्ष विभागाने त्यांची रजा नामंजूर केली होती.
विदेशातील पुरस्कार मिळवून देशाचे अन राज्याचे नाव उंचावणाऱ्या डिसले गुरुजींना आलेल्या अनुभवाबद्दल मिडियामधून बरीच चर्चा झाली.ज्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव जागतिक पातळीवर झाला त्यांना आलेला वाईट अनुभव यामुळे राज्यातील शिक्षण विभागाबाबत चांगलीच चर्चा रंगली.
हे प्रकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आदेश दिले.त्यानंतर थेट गायकवाड आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी डिसले गुरुजींचा अर्ज मंजूर केला आहे.