मुंबई – कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यासोबत हॉटेल,रेस्टॉरंट, बार,सलून मध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवावी,लग्नात 50 तर अंत्यसंस्कार ला 20 लोकांची उपस्थिती, रात्री दहा ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.येत्या सोमवार पासून नवे निर्बंध लागू होतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.मुंबई सह काही महानगरातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान सरकारने शनिवारी रात्री नवे निर्बंध लागू केले.हे आदेश सोमवार पासून लागू होतील.

शासकीय कार्यालयात प्रमुखाने वर्क फ्रॉम होम बाबत निर्णय घ्यावा,शाळा कॉलेज 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावेत,दहावी आणि बारावी वगळता इतर कोचिंग क्लासेस ऑनलाइन घेण्यावर भर द्यावा,बार,रेस्टॉरंट, हॉटेल मध्ये ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत अशा पन्नास टक्के ग्राहकांना प्रवेश द्यावा,नाट्यगृह, सिनेमा हॉल मध्ये 50 टक्के उपस्थिती असावी,बाहेरच्या राज्यातून यायचे असल्यास आरटीपीसीआर तपासणी केलेली असावी,स्पा,वेलनेस सेंटर,स्विमिंग पूल,जिम बंद ठेवावेत असे आदेशात म्हटले आहे.