बीड- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील ज्या प्रयोगशाळेचे उदघाटन करणार आहेत,त्यासाठी केली गेलेली साहित्य खरेदी वादात असून कोणत्याही टेंडर विना केल्या गेलेल्या या खरेदीतील अनागोंदीची मुंडे चौकशी करणार की या लोकांनाही पाठीशी घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात 23 मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या काळात गणेश बांगर, अजिनाथ मुंडे,रियाज,ठाकर,राजरतन जायभाये,बाजीराव चव्हाण या सारख्या गुत्तेदारांनी धुमाकूळ घातला.रुग्णालयात टाचणी पासून ते ऑक्सिजन प्लांट पर्यंत कोणत्याही प्रकारची खरेदी करायची असल्यास या लोकांनीच पुरवठा केला.
पुरवठा कोणी का करेंना पण त्यासाठीचे नियम पाळले गेले पाहिजेत, मात्र हे सगळे नियम बांगर,जायभाये,मुंडे यांनी धाब्यावर बसवले.पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला.जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले .
मात्र बांगर,मुंडे,जायभाये,ठाकर यांनी त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासत खरेदीत कोट्यवधी रुपये कमावून घेतले.बर हे करताना या लोकांनी तत्कालीन जे जे सीएस,एसीएस आणि वरिष्ठ अधिकारी होते त्यांनाही मलिदा दिला,त्यामुळं या लोकांवर कोणीच कारवाई केली नाही.
पुढच्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे,अशावेळी केवळ कागदावर केलेली साहित्य खरेदी किंवा निकृष्ट दर्जाची साहित्य खरेदी ही रुग्णांच्या जीवावर बेतू शकते अन त्याचे खापर अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,चव्हाण,जायभाये,ठाकर रियाज यांच्यावर नाही फुटणार तर पालकमंत्री म्हणून ते धनंजय मुंडे यांच्यावर फुटेल,त्यामुळे निकृष्ट अन कागदावर खरेदी करणाऱ्यांच्या मुसक्या पालकमंत्री आवळणार का? हाच खरा प्रश्न आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे हे ज्या विआरडीएल लॅब चे आज उदघाटन करणार आहेत,त्यासाठी झालेली साहित्य खरेदी देखील वादात आहे.गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,ठाकर यांनी कोणत्या दैनिकात याचे टेंडर छापले,किती टेंडर आले,सर्वात कमी दर कोणाचे होते?किती लोकांनी सहभाग घेतला,कोणत्या कंपनीने माल पुरवठा केला?या सगळ्या गोष्टीची चौकशी पालकमंत्री आज करणार आहेत का?
सरकारकडून पाठपुरावा करून आणलेला निधी जर हे कर्मचारी जे गुत्तेदार बनले आहेत ते लाटून,वाटून खाणार असतील तर मग त्यांच्यावर काही कारवाई होणार का?कारण या लोकांमुळे आरोग्य व्यवस्था खिळखिळी होऊन सलाईन वर आहे.आजपर्यंत गेल्या अठरा वीस महिन्यात झालेल्या खरेदीची चौकशी पालकमंत्री मुंडे करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.