मुंबई – भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी स्वतः ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
पंकजा मुंडे यांना अचानक ताप,सर्दी जाणवू लागल्याने त्यांनी स्वाब तपासणीसाठी पाठवले तेव्हा त्या पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यांनी त्यांच्या ट्विटमधून हीं माहिती दिली आहे.

कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याबरोबर मी स्वतः विलग झाले आहे,चाचणी केली,लक्षण आणि कोरोना दोन्ही आहे, सर्वांनी काळजी घ्यावी अस ट्विट त्यांनी केलं आहे.
राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनानंतर तब्बल दहा मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.गेल्या दोन दिवसात राज्यातील बधितांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे,त्यामुळे नागरिकांनी काळजीघेण्याची गरज आहे.