December 10, 2022

आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!

आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!

बीड – राज्यात गाजत असलेल्या आरोग्य विभाग भरती अन पेपरफुटी घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील भाजयुमो चा माजी पदाधिकारी संजय सानप याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात आपले नाव येईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू कर्मचारी दहा दिवसापासून गायब झाले आहेत.यातील बहुतांश कर्मचारी हे जिल्हा हिवताप कार्यालयातील आपल्या पाहुण्याच्या माध्यमातून सरकारी नोकरीला लागले अन नंतर त्यांनी पेपरफोडण्याचे उद्योग सुरू केले.या सर्वांच्या शोधासाठी आता पुणे पोलीस कामाला लागले आहेत.

आरोग्य विभागाने दीड महिन्यांपूर्वी घेतलेल्या गट ड च्या परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोग्य विभागातील दिग्गज अधिकारी अटक झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे.या घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील वडझरी येथील राजेंद्र सानप या कर्मचाऱ्याला अटक झाल्याने त्याने केलेले कुटाने आता समोर येत आहेत.

वडझरी या गावातील अनेक तरुण आरोग्य विभागात गेल्या पाच सहा वर्षात नोकरीला लागलेले आहेत,यातील वहाली येथील सचिन सानप, नायगाव येथील राजेंद्र शाहूराव सानप, पौंडुळ येथील अशोक राख हे एमपीडब्ल्यू गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कार्यालयातून गायब आहेत.त्यामुळे यांच्याभोवती संशय बळावला आहे.

तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी जीवन सानप हा देखील बारा दिवसापासून गायब आहे,या सर्वांचे मोबाईल देखील बंद आहेत.या सर्वांचा आरोग्य विभाग भरती घोटाळ्यात सहभाग असल्याची चर्चा आहे.या सर्वांनी केवळ एक दिवसाची रजा टाकल्याची माहिती त्यांच्या वरिष्ठांनी दिली आहे.मात्र त्यांचा या घोटाळ्याशी संबध आहे की नाही याची माहिती त्यांच्याकडे नाही.या कर्मचाऱ्याबाबत पोलिसांकडून कार्यालयात चौकशी झाल्याच्या वृत्ताला या वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click