August 9, 2022

अखेर आपला माणूस शिक्षणाधिकारी पदी बसवला !

अखेर आपला माणूस शिक्षणाधिकारी पदी बसवला !

बीड – क्लास वन अधिकाऱ्याला शिवीगाळ करून रजेवर पाठवल्यानंतर जी प उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आपला माणूस म्हणजेच अजय बहिर यांना या पदावर बसवले आहे.धारूर सारख्या तालुक्यात पोषण आहार अधीक्षक असणाऱ्या बहिर यांच्याकडे पदभार देऊन मनमानी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे याकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीड जिल्हा परिषदेत आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातय अशी अवस्था आहे.शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी असणारे श्रीकांत कुलकर्णी यांना शिक्षकांच्या समायोजनावरून जी प उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केबिनमध्ये जाऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती .

हा प्रकार झाल्यानंतर कुलकर्णी हे पंधरा दिवसासाठी रजेवर गेले.त्यांनी रजेवर जाण्यासाठी पदाधिकारी सोनवणे यांनी जंगजंग पछाडले होते.कुलकर्णी रजेवर जाताच दोन दिवसात सुत्र हलली. धारूर येथे उपशिक्षणाधिकारी कार्यालयात पोषण आहार अधीक्षक असणाऱ्या बहिर यांच्याकडे हा पदभार देण्याची फाईल सीईओ यांच्याकडे पाठवण्यात आली.

सोमवारी सायंकाळी या फाईलवर सीईओ अजित पवार यांची स्वाक्षरी झाली.बहिर हे कोणत्याच दृष्टीने या पदासाठी उपयुक्त नाहीत.ते लिपिक वर्गीय कर्मचारी आहेत,शिक्षण विभागाच्या कार्यालयाचा कारभार ते नियमाने करू शकतात का?त्यांच्याऐवजी इतर कोणीच लायक अधिकारी नव्हता का?बहिर हे एवढे का लाडके आहेत ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

बहिर सारख्या कनिष्ठ व्यक्तीकडे हा पदभार देऊन मनमानी कारभार करण्यास प्रोत्साहन देण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे.याकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click