बीड- जिल्हा रुग्णालयातून रेमडीसविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे उघड आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते यांच्यासह डॉ सुखदेव राठोड अन इतरांना चौकशीसाठी पाचारण केले होते,मात्र गित्ते हे अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत ना ते बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले आहेत.त्यामुळे गित्ते कुठे आहेत असा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर बीड जिल्ह्यात रेमडीसविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.रुग्ण आणि नातेवाईक यांनी दहा हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत इंजेक्शन खरेदी केले.विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातून या इंजेक्शन चा काळाबाजार सर्रास सुरू होता.
या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ सुखदेव राठोड,अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,रियाज या सगळ्यांविरुद्ध कारवाई सुरू झाली.या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी चौकशी सुरू केली आहे.
राठोड यांच्यासह इतरांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र तत्कालीन सीएस डॉ गित्ते हे अद्याप एकदाही चौकशीला हजर राहिलेले नाहीत.चार पाच महिन्यांपूर्वी त्यांची लोखंडी सावरगाव येथे बदली झाली,मात्र ते तिकडे देखील रुजू झालेले नाहीत.
गित्ते हे नेमके कुठे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत,रेमडीसविर प्रकरणात अनेक डॉक्टर, कर्मचारी,अधिकारी आणि पत्रकार देखील सहभागी असल्याची चर्चा आहे.