बीड – आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात बीडचे तत्कालीन सीएस यांच्या खास मर्जीतील असलेला तो पीए (पलांडे) कोण अन या प्रकरणात त्या सीएस सह पीए पर्यंत पोलीस पोहचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह्यात आरोग्य विभागात ढवळाढवळ करणाऱ्या या पीए च्या मुसक्या पोलीस लवकरच बांधणार का,अशी चर्चा रंगू लागली असून त्यामुळे तत्कालीन सीएस अन पीए तसेच सगळ्या पेपरफोडी गॅंग ची झोप उडाली आहे.
आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षा मागील दोन महिन्यांपूर्वी झाल्या.लाखो विद्यार्थी यासाठी इच्छुक होते.या परीक्षेसाठी असलेली प्रश्नपत्रिका काही महाभागांनी फोडली.यामध्ये जालना,नांदेड,लातूर, पुणे,मुंबई एवढंच नाही तर आता बीड जिल्ह्यातील देखील आरोग्य विभागात कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
बीड येथून ताब्यात घेतलेले लोक हा पेपरफोडी गॅंग चा पार्ट 1 आहे.याचे कनेक्शन थेट बीड ते नाशिक व्हाया लातूर असल्याची चर्चा आहे.ज्याप्रमाणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए पलांडे हे त्यांच्यासाठी अनेक कामे करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक झाली तशी अटक बीड जिल्ह्यातील त्या पीए ला अटक होणार का अशी चर्चा आहे.
हा पीए कोण आहे,तो काय करतो,त्याने यात किती रक्कम घेतली,त्याचा अन बीड,लातूर, नाशिक चा काय संबध हे आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत.या पीए ने यापूर्वी देखील अनेक विषयात परस्पर मांडवली केलेली आहे.विशेषतः तत्कालीन सीएस यांच्या माध्यमातून आपले खास लोक जिल्हा रुग्णालयात गुत्तेदारी मध्ये सेटल केले आहेत.
लातूर च्या प्रशांत बंडगिरे नंतर बीड जिल्ह्यातील बंडगिरे कोण हे आम्ही जाहीर करणार आहोत,मात्र पोलीस त्याच्या मानगुटीवर बसून तपास करणार का,तसे केल्यास अनेक रथी महारथी,मोठं मोठ्या पदासाठी स्पर्धेत असणारे अनेक मोठे मासे गळाला लागतील अन पेपरफोडी गॅंग चा पर्दाफाश होईल .