January 28, 2022

एसीएस राठोड सह इतरांना ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश !

एसीएस राठोड सह इतरांना ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश !

बीड- रेमडीसविर इंजेक्शन घोटाळा जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड,तत्कालीन स्टोर किपर अजिनाथ मुंडे आणि इतरांच्या गळ्याचा फास बनत असल्याचे चित्र आहे.या प्रकरणी दररोज बीड शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश या सर्वांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात रेमडीसविर या इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. इंजेक्शन न मिळाल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला होता.तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसला अन त्याचा फायदा एसीएस डॉ सुखदेव राठोड अन इतरांनी घेतला.

सूर्यकांत गित्ते यांच्या काळात खरेदी असो की इतर कामे डॉ राठोड यांनीच केली.गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये,पत्रकार नितीन चव्हाण यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली.

राठोड आणि मुंडे यांनी सगळ्यात मोठी गोष्ट या काळात केली ती म्हणजे मड्यावरच्या टाळूच लोणी खाण्याचा प्रकार केला.कोरोनामुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या रुग्णांना वीस,तीस ,चाळीस हजार रुपये घेऊन इंजेक्शन विक्री केले.पण म्हणतात ना पापाचा घडा भरतोच तसच या प्रकरणी देखील सात महिन्याने का होईना पोलिसांना तक्रारीची दखल घ्यावी लागली अन राठोड,मुंडे,बांगर,चव्हाण,रियाज यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

इंजेक्शन च्या काळाबाजार प्रकरणी डॉ सुखदेव राठोड सह इतरांना दररोज शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहे,त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click