January 28, 2022

ओबीसी आरक्षण अध्यादेश स्थगित !

ओबीसी आरक्षण अध्यादेश स्थगित !

मुंबई – ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे,त्यामुळे आगामी निवडणुका आरक्षणाशिवाय होणार की सरकार नव्याने न्यायालयात बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजीहोणार आहे.

ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होणार आहे. राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत सुप्रिम कोर्टाने अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

पुढच्या वर्षात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर काही सर्वे करण्यात आला आहे का? इंम्पिरिकल डेटा तेवढा पुरेसा आहे का? त्याचबरोबर ओबीसींचं प्रतिनिधित्व किती आहे? यासंदर्भात काही अभ्यास केला आहे का, हे तीन मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. पण यासंदर्भात काही अभ्यास न करता राज्य सरकराने थेट अध्यादेश काढला. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे आता यावर 13 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click