बीड – जिल्हा रुग्णालय लुटून खाणाऱ्या गणेश बांगर याने नोकरीचा राजीनामा दोन दिवसांपूर्वी दिला आहे,मात्र राजीनामा दिला म्हणजे सगळ्या केलेल्या कुटण्याची जबाबदारी संपली असे होत नाही.त्यामुळे बडतर्फ झालेला जायभाये,बदली झालेला मुंडे अन राजीनामा दिलेला बांगर या तिघांनी केलेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या दीड दोन वर्षात जवळपास दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची साहित्य अन औषध खरेदी झाली.यामध्ये रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये आणि गणेश बांगर या तिघांनी मनमानी कारभार केला.सीएस कोणीही असो प्रत्येकाला कस खिशात घालायचं हे या तिघांना चांगलंच माहीत होतं.
त्यामुळे एजन्सी यांनीच आणायची, फायनल यांनीच करायचं,ऑर्डर यांनी पास करायची अन माल किती आला अन बिल किती झालं हे यांनीच ठरवायचं असा कारभार केला गेला.या माध्यमातून या तिघांनी कोट्यवधी रुपये कमावले. हा सगळा प्रकार न्यूज अँड व्युज ने चार दिवसांपासून लावून धरल्यानंतर गणेश बांगर याने सीएस यांच्याकडे आपल्या कंत्राटी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
मात्र कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून आता प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आल्यावर जर बांगर सारखे लोक राजीनामा देऊन कारवाई होणार नाहीत अस समजत असतील तर धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले सीएस डॉ सुरेश साबळे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.