December 6, 2022

विषाणू परीक्षण प्रयोगशाळेसाठी बांगर ने केला लाखोंचा पुरवठा !

विषाणू परीक्षण प्रयोगशाळेसाठी बांगर ने केला लाखोंचा पुरवठा !

बीड – जिल्हा रुग्णालयात दोन तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेली अन दिवाळीत उद्घाटन करण्यात आलेल्या व्हीआरडीएल अर्थात आरटीपीसीआर लॅब साठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा कर्मचारी असलेल्या बांगर मॅडम आणि त्यांच्या भावाने केला आहे.या पूरवठ्याचे टेंडर कोणत्या दैनिकात छापले,किती लोक या प्रक्रियेत सहभागी झाले,कोण लोयस्ट होते हे सगळेच गौडबंगाल आहे.आम्ही दोघे बहीण भाऊ जिल्हा रुग्णालयाला चुरून खाऊ असाच प्रकार सध्या सुरू आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचारी च गुत्तेदार झाल्याच्या बातम्या न्यूज अँड व्युज ने दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.बडतर्फ करण्यात आलेला जायभाये असो की बदली झालेला मुंडे अथवा कंत्राट संपलेला पंकज कुलकर्णी किंवा रक्तपेढी प्रमुख बांगर मॅडम यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात स्टोर चा कारभार आठ महिन्यांपूर्वी पर्यंत अजिनाथ मुंडे यांच्याकडे होता,त्यानंतर हा पदभार ठाकर कडे आला.मुंडे असो की ठाकर या दोघांनी बाहेरच्या पुरवठा दाराला जिल्हा रुग्णालयात एन्ट्री मिळूच दिली नाही.बांगर मॅडम आणि गणेश बांगर यांनी इस्टीमेट काढायचे अन मुंडे किंवा ठाकर ने मंजुरी आणायची असा खेळ सुरू आहे.

अंबाजोगाई येथील विषाणू परीक्षण प्रयोगशालेत मोठ्या प्रमाणात नमुने पाठवले जात असल्याने लोड येत होता.त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडला ही प्रयोगशाळा मंजूर केली.दिवाळीच्या आसपास या प्रयोगशाळेचे उदघाटन झाले.मात्र यासाठी जे काही साहित्य लागते त्याचा पुरवठा हा बांगर यानेच केला.

चाळीस ते पन्नास लाख रुपयांची खरेदी करण्यासाठी कोणत्या दैनिकात टेंडर छापण्यात आले?यासाठी किती पुरवठा दार सहभागी झाले?त्यात कोण कोण पात्र ठरले?या पात्र लोकांत कोणाचे टेंडर लोयस्ट होते?कोणत्या निकषावर या पुरवठा दार पत्र झाला?असे एक ना अनेक प्रश्न यानंतर उपस्थित होत आहेत.हे सगळे काम बांगर यानेच केल्याने पुरवठा अन खरेदी यावर शंका उपस्थित होत आहे.

कंत्राटी कामगार असलेल्या गणेश बांगर याने तर पुरवठ्यातून मिळणाऱ्या मलिद्यासाठी नोकरी देखील सोडली.विषाणू परीक्षण प्रयोगशाळेसाठी लाखो रुपयांची खरेदी करण्यात आली.मात्र निकष पायदळी तुडवण्यात आले. या सगळ्या प्रकारावर अद्याप सीएस सुरेश साबळे मात्र गप्प आहेत याचे कारण समजू शकलेले नाही.

ज्या दोन बहीण भावाने जिल्हा रुग्णालयात पुरवठा करून अव्वाच्या सव्वा बिले काढली त्यांच्यावर सीएस साबळे काही कारवाई करणार आहेत का?असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click