बीड – बीड जिल्हा रुग्णालयात नेमकं काय चालू आहे हे बघायला कोणालाच वेळ नाहीये,ना पालकमंत्री, ना जिल्हाधिकारी ना सीएस.सगळेच आपल्या कामात व्यस्त असल्याने जिल्हा रुग्णालयात कर्मचारीच गुत्तेदार झाले आहेत.त्यामुळे आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय अशी अवस्था जिल्हा रुग्णालयाची झाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षात कोविड च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी झाली.मास्क,सॅनिटायझर,ग्लोव्हज,पीपीई किट या राज्य आणि लोकल पातळीवर खरेदी केल्या गेल्या.मात्र त्याशिवाय रुग्णालयात ज्या औषधी खरेदी केल्या जातात त्याचा पुरवठा रक्तपेढी प्रमुख असलेल्या बांगर मॅडम आणि स्टोर किपर असलेले जायभाये यांचेच भाऊबंद करत असल्याचे चित्र आहे.
रक्तपेढी मध्ये काम करणाऱ्या बांगर मॅडम या दोन ठिकाणी कार्यरत आहेत,जे नियमाला धरून आहे की नाही हे पाहयला देखील कोणालाच वेळ नाही.सीएस सुरेश साबळे यांच्याकडे प्रभारी पदभार आहे त्यामुळे ते अधिकार वाणीने याकडे लक्ष देत नाहीत,तर एसीएस असलेले डॉ सुखदेव राठोड हे दहा पाच टक्के घेण्यात मश्गुल असल्याची चर्चा आहे.
कोरोना कमी व्हावा म्हणून राज्य सरकारकडून पाहिजे ती मदत आणण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे हे प्रयत्नशील असताना मुख्य स्टोर किपर ठाकर याने स्वतःचे घर भरण्याचे काम केले आहे.ठाकर आणि मुंडे नामक स्टोर किपर यांनी लाखो रुपये छापण्याचा उद्योग केला आहे.
जिल्हा रुग्णालय म्हणजे या ठिकाणी नोकरीस असलेले स्टोर किपर आणि कर्मचारी यांच्यासाठी कुरण झाले आहे.स्वतःच्या घरच्या भाऊ,बहीण यांच्या नावावर एजन्सी दाखवायची,माल,औषधे पुरवठा केल्याचे दाखवायचे अन कागदी घोडे नाचवत लाखो रुपये घशात घालायचे हा उद्योग जोरात सुरू आहे.
त्यामुळं या गोष्टीकडे सीएस साबळे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बांगर मॅडम सारखे कर्मचारी जर दोन ठिकाणी काम करत असतील तर त्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.