नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मुळे महिला विश्वचषक क्वालिफायर सामने रद्द करण्यात आले आहेत.एवढंच नव्हे तर भारतात आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला अलर्ट जारी केला आहे.
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नेदरलँड्सनेही अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौराही संकटात सापडला आहे. पुढच्या महिन्यामध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.मात्र यावर आता बीसीसीआय निर्णय घेणार आहे.
नव्या व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत,तर राज्य सरकारने देखील यापुढे कोरोनाच्या नियमात मोठा बदल केला आहे.केंद्राने आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट रद्द करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.