बीड- तुम्ही सणावाराच्या काळात जो खवा खाल्ला तो बनावट तर नव्हता ना,हा प्रश्न आम्ही विचारतोय कारण केज पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे समोर आले आहे.केज जवळ असलेल्या उमरी येथे केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या फॅक्टरी चा पर्दाफाश झाला आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत .
गुटखा तस्करी प्रकरणात थेट शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून खळबळ उडवून देणारे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी भेसळयुक्त खवा निर्मिती केंद्रावर छापा घालून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे .सणावाराच्या दिवसांत सर्वसामान्य माणूस मोठ्या विश्वासाने जो खवा खरेदी करतो तो देखील बनावट असू शकतो हे या कारवाईने स्पष्ट झाले आहे .
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज ते बीड जाणारे रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्या समोर उंमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी येथे बनावट दूध पावडर पासून खवा निर्मिती करून विक्री केली जात असल्याचे समजल्यानंतर त्या ठिकाणी छापा घातला.
धनंजय महादेव चौरे रा. जिवाचीवाडी केज हल्ली मुक्काम उमरी शिवार तालुका केज हे त्यांचे कंपनीमध्ये दुधाचे पावडर पासून बनावट खवा तयार करून त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावर सदर ठिकाणी एफडीए चे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी तन्मडवार व त्यांचे पथक यांना बोलून त्यांची मदतीने दोन पंच सह सदर कंपनीचे ठिकाणी जाऊन रात्री नऊ वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी दुधाचे पावडर मध्ये वनस्पती रूची तेल मिक्स करून त्यापासून तयार केलेले खव्याचे पदार्थ संशयित वाटल्याने अन्न सुरक्षा अधिकारी सय्यद इम्रान हस्मी, तन्मडवार यांनी सदर ठिकाणाहून 2958 किलोग्राम किमती 5 लाख 37 हजार 480 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करून जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने सीए तपासणी कामे काढून घेऊन ताब्यात घेतले सदरची कंपनी पुढील आदेशापर्यंत सील केली आहे
सदरची कारवाई सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत अन्नसुरक्षा पथकाचे अधिकारी सय्यद इम्रान हाश्मी ,तन्मडवार,मिर्जा व पोलीस उपनिरीक्षक मारुती माने पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे बाबासाहेब बांगर पोलीस नाईक रामहरी भंडाने राजू वंजारे सचिन आहंकारे संतोष राठोड शेंडगे मपोना पाचपिंडे यांनी केली आहे