मुंबई – पेट्रोल अन डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक हैराण झाले आहेत.तसेच केंद्रीय परिवहन मंत्रालयाने इ बाईक्स अन इलेक्ट्रिक गाड्यांना महत्व दिल्याने बाजारात नवनवीन दुचाकी अन चारचाकी इलेक्ट्रिक वाहने येत आहेत.आता केवळ 499 रुपये भरून तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता.पुढील महिन्यापासून या बाईकची नोंदणी अन विक्री सुरू होणार आहे.
बाऊंन्स इन्फिनीटी या कंपनीने नवी बाईक बाजारात आणली आहे .यामध्ये उत्तम आणि काढता येणारी ली-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे गाडीतून बॅटरी काढून घेऊन तीचे चार्जिंग करू शकतात.या जोडीला, बाऊंन्स तर्फे वैशिष्ट्यपूर्ण ‘बॅटरी ऍज अ सर्व्हिस’ हा पर्यायही देण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत हे प्रथमच होत आहे.
यामध्ये ग्राहकांना एकदम वाजवी किंमतीत बॅटरी शिवाय बाऊंन्स इन्फिनीटी खरेदी करण्याचा आणि बाऊंन्स बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क त्याऐवजी वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहकांनी बॅटरी स्वॅप्ससाठी पैसे भरले की बाऊंन्स स्वॅपिंग नेटवर्कमधून रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात संपूर्णपणे चार्ज झालेली बॅटरी ते घेऊ शकणार.
यामुळे पारंपरिक स्कूटर्सच्या तुलनेत या स्कूटरची प्रवाही किंमत 40 टक्क्यापर्यंत खाली उतरते. बाऊंन्सने 2021 मध्ये 22 मोटर्समध्ये 100 टक्के वाटा मिळवला असून या कराराचे मूल्य 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. 22 मोटर्सशी झालेल्या कराराचा भाग म्हणून बाऊंन्सने राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन केंद्र यांच्यावर ताबा मिळवला आहे. या अत्याधुनिक केंद्राची दरवर्षी 1,80,000 स्कूटर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे. भारतीय बाजारपेठेची क्षमता लक्षात घेऊन, कंपनी दक्षिण भारतात आणखी एक उत्पादन केंद्र उभारण्याची योजना आखत आहे. पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर गुंतवण्यासाठी बाऊंन्सने बाजूला ठेवले आहेत.