बीड – गुटखा तस्करी करायची,पिढया न पिढ्या बरबाद करायच्या,वाळू तस्करी करून नदीच्या पात्राच वाटोळं करायचं,मटका अन पत्याचे क्लब चालू करून हजारो संसार उध्वस्त करायचे अन पुन्हा उजळ माथ्याने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन शहाणपण शिकवायचं,हा एवढा माज येतो कुठून असा प्रश्न गुन्हा दाखल होऊन फरार असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रकरणानंतर उपस्थित होत आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गुटखा,मटका आणि वाळूच्या मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या.या बहुतांश प्रकरणात एक नाव नेहमी चर्चेत आला ते म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे.मागील महिन्यात खांडे यांच्या पत्याच्या क्लबवर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने छापा घातला होता.तेव्हा देखील पहाटे चार वाजेपर्यंत बीड शहर पोलीस ठाण्यात खांडे बसून होते.
बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते,यामध्ये महारुद्र मुळे उर्फ आबा मुळे हाच प्रमुख असल्याचे दिसून आले.मात्र या मागचा सूत्रधार हा कुंडलिक खांडे हाच असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले.मात्र कारवाई झालेली नव्हती .
दरम्यान चार दिवसांपूर्वी कुमावत यांच्या पथकाने घातलेल्या छाप्यात खांडे सह मुळे वर देखील गुन्हा दाखल झाला.पोलीस खंडेच्या घरी देखील जाऊन आले.मात्र खांडे हा मुंबईत होता.दुसऱ्या दिवशी शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या जाहीर कार्यक्रमत खांडे हा हजर होता.त्यांच्या स्वागतासाठी देखील खांडे कार्यकर्त्यांना घेऊन होता.
एकीकडे गुन्हा दाखल झालेला असताना अन पोलीस शोध घेत असताना सार्वजनिक कार्यक्रमात उजळ माथ्याने फिरण्याची हिम्मत तरी कशी होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.सगळे दोन नंबरचे धंदे करायचे अन उजळ माथ्याने फिरायचे याला कारण सत्तेची ऊब आहे.
याच कुंडलिक खांडे याच्यावर रोहयो मध्ये घोटाळा केल्याप्रकरणी आरोप झाले होते,मात्र त्यानंतर पक्षाने त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला जिल्हाप्रमुख पदाची बक्षिसी दिली.त्यानंतर बेफाम सुटलेल्या खांडे याने जेवढे काही अवैध धंदे असतील त्यात स्वतःचा सहभाग असावा असा अट्टाहास धरला.अन त्यातूनच अखेर पापाचा घडा भरला अन गुन्हा दाखल झाला.मात्र पोलीस हे सत्ताधारी पक्षाचे बटीक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.