बीड- तुलसी विवाह संपन्न झाल्यानंतर सुरू होते ती लग्नसराई ची धामधूम, येणाऱ्या काळात मुबलक प्रमाणात लग्नाच्या तारखा असल्याने विवाहेच्छुकांना अच्छे दिन येणार आहेत .
डिसेंबर 2021 मध्ये 1,2,6,7,8,9, 11 आणि 13 या तारखा विवाह सोहळ्यासाठी शुभ आहेत. प्रबोधिनी एकादशीनंतर 14 डिसेंबरपर्यंत म्हणजेच सुमारे एक महिन्याचा कालावधी हा विवाह सोहळ्यासाठी अनुकूल आहे. 14 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत मलमास असल्यानं या कालावधीत विवाहासाठी शुभ मुहूर्त नाहीत. हिंदू धर्मात मलमास हा सर्व शुभ कार्यांसाठी निषिद्ध मानला जातो. 14 जानेवारीला मल मास संपल्यानंतर पुन्हा विवाहासह अन्य शुभकार्यं करता येणार आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी 2022 मध्ये 14 जानेवारीपर्यंत मलमास असेल. त्यानंतर 22, 23,24 आणि 25 जानेवारीला विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये देखील विवाहाकरिता शुभमुहूर्त आहेत. 5,6,7,9,10,11, 12, 18, 19, 20 आणि 22 फेब्रुवारीला शुभमुहूर्त असल्यानं विवाह, तसंच अन्य कोणतंही शुभ कार्य करणं शक्य आहे.
नव्या वर्षाच्या मार्च महिन्यात 4 आणि 9 मार्च असे केवळ दोनच शुभमुहूर्त आहेत. एप्रिल 2022 मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर शुभ मुहूर्त आहेत. 14,15,16,17,19,20,21, 22, 23, 24 आणि 27 एप्रिलला शुभमुहूर्त असल्यानं त्या दिवशी विवाह किंवा अन्य शुभकार्यं करणं श्रेयस्कर ठरणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्यान