बीड – गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल असलेला अन फरार झालेला सत्ताधारी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हा पोलिसांच्या उरावर बसून शिवसेना सचिव खा अनिल देसाई यांच्या स्वागताला हजर राहिल्याने बीड पोलीस सत्ताधाऱ्यांचे बटीक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा अनेकवेळा झाली.मात्र प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी नांदूरघाट,समनापूर आणि बीड मध्ये गुटख्याच्या गोदामावर छापे घातले .यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख खांडे हा फरार झाला.
फरार खांडे हा थेट मुंबई ला मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरबारात हजर झाला,त्यामुळे कदाचित पोलीस खांडे याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत .

दरम्यान शिवसेनेचे सचिव खा अनिल देसाई हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते .त्यावेळी जिल्हाप्रमुख म्हणून फरार असलेले कुंडलिक खांडे हा देसाई यांच्या स्वागतासाठी हजर असल्याचे दिसून आले .
एवढंच नव्हे तर जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या हजेरीत फरार आरोपी खांडे हा हजर होता.बीडचे पोलीस दोन नंबर चा धंदा करणाऱ्या लोकांचे बटीक बनले असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आशा फरार अन गुटखा तस्कर आरोपीला पाठीशी घालणार की कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे .