नवी दिल्ली- आयसीसी ने पुढील वर्षी होणाऱ्या अंडर 19 वर्ल्डकप चे वेळापत्रक घोषित केले असून त्यानंतर सर्वच चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे .या स्पर्धेतून न्यूझीलंड संघाने माघार घेतली आहे न्यूझीलंडनं हा निर्णय देशातील अल्पवयीन नागरिकांना स्पर्धेतून परत आल्यानंतर पाळव्या लागणाऱ्या अनिवार्य क्वारंटाईन नियमांमुळे घेतला आहे.
न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा 16 वी टीम म्हणून स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडला यापूर्वी या वर्ल्ड कपसाठी पात्र होण्यात अपयश आलं होतं. 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमधील 10 वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाईल. यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया स्पर्धेनं या वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप 1988 पासून खेळवला जात आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या 13 सिझन झाले आहेत. त्यामध्ये भारताने सर्वाधिक 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला 3, पाकिस्तानला 2 तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला प्रत्येकी 1-1 वेळा विजय मिळाला आहे. 2020 साली झालेल्या अखेरच्या अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.विराट कोहलीनंही कर्णधार म्हणून एकदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे.