मुंबई – काँग्रेसचे दिवंगत विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेस कडून स्व राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे .तर भाजपकडून या जागेसाठी औरंगाबाद चे संजय केणेकर यांना संधी देण्यात आली आहे.आमदारांमधून ही निवड होणार असल्याने महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव यांची निवड निश्चित मानली जात आहे .
काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी होती. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
भाजपकडून या जागेसाठी औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय किणेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत, असं देखील पाटील यावेळी म्हणाले. जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे.
राज्यातील राजकीय गणित लक्षात घेता महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.भाजपने उमेदवार दिल्याने काही चमत्कार होतो का हे देखील पाहणे औत्सुक्याचे आहे.