बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 644 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 638 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
जिल्ह्यात आष्टी 3 बीड 2 गेवराई 1असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात दिवसभरात १ हजार २० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ९९९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ४९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६६,९१३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६४ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२३,३४४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०५६५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.राज्यात आज रोजी एकूण १२,२१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना महामारीचा देशातील प्रादुर्भाव अद्याप कमी व्हायचं नाव घेईना. काही राज्यातील रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे देशाच्या दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 11 हजार 271 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच कालावधीत 11,376 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 35 हजार 918 इतकी झाली आहे.