November 30, 2021

रुग्णालय आग प्रकरणी चार महिलांना अटक !

रुग्णालय आग प्रकरणी चार महिलांना अटक !

अहमदनगर – येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आग प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एका निलंबित महिला डॉक्टर सह चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रशासनाने यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांना यापूर्वी निलंबित केले आहे.आता पोलिसांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

नगर जिल्हा रुगणल्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे.
मागील शनिवारी (6 नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना तपासादरम्यान या चार महिलांविरोधात निष्काळजीपणा केल्याचे पुरावे मिळाल्याने त्यांना आरोपी करुन अटक केल्याचे तपासी अधिकारी उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यांना आरोग्य विभागाने सोमवारी निलंबित केलेले आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि चन्ना यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

त्यानंतर आता चार महिलांना अटक झाल्याने संघटनेने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि अन्य एका वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *