नवी दिल्ली – आगामी न्यूझीलंड सोबत होणाऱ्या टी ट्वेन्टी आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआय ने केली.या मालिकेत कर्णधार पद रोहित शर्मा कडे तर उपकर्णधार म्हणून के एल राहुल वर जबाबदारी देण्यात आली आहे.
या सिरीजसाठी विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच शार्दुल ठाकूर, वरूण चक्रवर्ती, राहुल चहर यांना डच्चू देण्यात आला आहे.
या संघात व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि हर्षल पटेल हे भारतीय संघात पहिल्यांदा स्थान मिळाले आहे.युजुवेंद्र चहल, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हीसी), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर पंत (डब्ल्यूसी), इशान किशन (डब्ल्यूसी), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार. दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज