मुंबई – उदय शेट्टी आणि मजनू यांच्या लफडयात पडलेल्या संजय राऊत यांचा घुंगरू सेठ झालाय अशी बोचरी टीका भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.नगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या प्रकरणावरून सत्ताधारी अन विरोधक यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे.
नगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीवरून संजय राऊत यांनी केंद्राला लक्ष्य केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
“सर्वज्ञानी संजय राऊत नगरच्या आगीच खाप केंद्रावर फोडत आहे. पण व्हेंटिलेटर नव्हे संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनलीय” शिवसेना अन राष्ट्रवादी या दोघांची मर्जी सांभाळताना राऊत यांची अवस्था उदय शेट्टी अन मजनू यांची मर्जी सांभाळणाऱ्या घुंगरू सेठ सारखी झाली आहे अशी जळजळीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
“डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवतेय. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. डॉक्टर आणि काही नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असले, तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
“PWD वर प्रश्नचिन्ह का नाही. डॉक्टर बडतर्फ होत असेल, तर मंत्री का नाही? या प्रश्नी श्वेतपत्रिका काढा. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करू असे आश्वासन दिले होते. पण केले नाही. सरकार फक्त खंडणी गोळा करतेय” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. “अकरा लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक शमलेली नाही. एक वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते” असा सवाल त्यांनी केला.