November 30, 2021

पालखी मार्गांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन !

पालखी मार्गांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन !

नवी दिल्ली- पंढरपूर आणि माझा थेट संबंध असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळंदी पंढरपूर यासह दोन पालखी मार्गांचे भूमिपूजन केले .यावेळी बोलताना मोदी म्हणाले की गुजरातमधील द्वारका इथे येऊन मिळते तर मी काशीचा आहे आणि पंढरपूरला दक्षिणेचे काशी म्हणतात. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ यांना भूमीने युगसंगत बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले

केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते,कार्यक्रमास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यानंतर मोदी विठ्ठलाने तुमच्यासोबत मला जोडलं यापेक्षा जास्त आनंद कशात असू शकतो असे म्हणाले. पंढरपूरला आनंदाचे स्वरुप असून आज सेवेचा आनंद आहे. मला अतिशय आनंद होत आह की, संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे उद्घाटन होत आहे. रस्ते हे विकासाचे द्वार असतात. तसेच पंढरपूरच्या दिशेने जाणारे हे मार्ग भागवत धर्माचा पताका आणि उंच फडकणारे महाद्वार ठरतील. पंढरपूरसारख्या मार्गाकडे जाणारे हे द्वार महाद्वार ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंढरपूर पालखी मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले. हे काम ३ टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. पहिल्या टप्यात ३५० किमी हायवे करण्यात येणार असून यासाठी ११ हजार करोड रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या दोन्ही हायवेच्या बाजूला पालखी यात्रेसाठी पायी चालण्यासाठी विशेष मार्ग बनवण्यात येणार आहेत. पंढरपूरला जोडणारे सव्वा दोनशे किलोमीटर हायवेचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले आहे. बाराशे करोड खर्च करण्यात आले आहे. हे मार्ग पंढरपूरला जाण्यासाठी मदत करतील. महामार्ग या क्षेत्राचा विकास करणारे माध्यम बनतील. यासोबत दक्षिण भारताची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली झाली आहे. यामुळे पंढरपूरला अनेक भक्त येतील असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यापुर्वी आपल्या भारतामध्ये अनेक हल्ले झाले आहेत. शेकडो वर्षांच्या गुलामीमध्ये देश जखडला गेला. नैसर्गिक आपत्ती आली. अनेक कठीण प्रसंग आले. परंतु विठ्ठलाची वारी अखंडीत सुरु राहिली. आषाढी यात्रेला पंढरपूरचे विहंगम दृष्य यला मिळते. दिंडीमध्ये भेदभाव नाही होत. प्रत्येक वारकरी समान आहे. प्रत्येक वारकरी एकमेकांचा गुरुभाव आहे. फक्त एकच विठ्ठलाचे भक्त म्हणून असतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये सांगितले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *