मुंबई – राज्याचे माही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस ला आणखी एक धक्का बसला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित तब्बल एक हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
आयकर विभागाला मुंबईतील काही रिअल इस्टेट व्यावसायिक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या ताब्यात 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती.
केंद्रीय संचालक कर मंडळाने (CBDT) एका निवेदनात म्हटले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये सुमारे 70 ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान बेनामी व्यवहारही आढळून आले असून, त्याबद्दल काही पुरावे हाती लागले आहेत.
छाप्यात सापडलेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरून दोन्ही ग्रुपकडे सुमारे 184 कोटी रुपये सापडले आहेत, ज्याचा कोणताही हिशेब उपलब्ध नाही. मात्र, या दोन्ही ग्रुपपैकी एकाही गटाचे नाव या विभागाने दिलेले नाही.
छाप्याच्या दिवशी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आयकर विभागाने त्यांच्या तीन बहिणींच्या जागेवरही छापे टाकले आहेत. त्यापैकी एक कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात राहतात.
जरंडेश्वर शुगर फॅक्टरी- किंमत- सुमारे 600 कोटी
साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट- किंमत- सुमारे 20 कोटी
पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस- किंमत सुमारे 25 कोटीनिलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट- किंमत- सुमारे 250 कोटी,महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन- किंमत सुमारे 500 कोटी