नवी दिल्ली – बँकिंग असो की तुमचं किचन अथवा तुमच्या हातातील मोबाईल अन त्यातील व्हाट्सएप यामध्ये मोठे बदल होणार आहेत.विशेषतः काही मोबाईल मधील व्हाट्सएप देखील बंद होणार आहे.त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
1 नोव्हेंबरपासून बँकिंग नियम बदलणार आहेत. आता तुम्हाला बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल. बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे. या बँकेत पुढील महिन्यापासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंगसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागणार आहेत.
याद्वारे खातेदारांसाठी तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केले तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांना डिपॉझिटवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु पैसे काढल्यावर 100 रुपये द्यावे लागतील.
1 नोव्हेंबरपासून एलपीजी म्हणजेच एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. LPG च्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलपीजीच्या विक्रीतील तोटा पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवू शकते.
1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडर वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलिंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा तुम्हाला हा OTP डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतर ग्राहकाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल.
1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सएप काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर काम करणे बंद करणार आहे. WhatsApp वर दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Android 4.0.3 , iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.