बीड- जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या रविवारी अकरा वर पोहचली.पाच तालुक्यातील रुग्णसंख्या अकरा असून सहा तालुके निरंक आहेत.

बीड जिल्ह्यातील 965 रुग्णांची तपासणी केली असता आष्टी,बीड,धारूर,परळी आणि शिरूर तालुक्यात अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
यामध्ये आष्टी पाच,बीड 3,तर धारूर,परळी आणि शिरूर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी बाजारातील दिवाळीच्या खरेदीसाठी जी गर्दी होत आहे ती पाहता रुग्णसंख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी दिवाळी साजरी करताना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.।