बीड- मागच्या वर्षभरात जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सध्या काढता पाय घेतल्याचे चित्र आहे.गेल्या महिना दीड महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील 1018 रुग्णांची तपासणी केली असता त्यात पाच तालुक्यातील आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत तर 1010 रुग्ण निगेटिव्ह आहेत.विशेष बाब म्हणजे शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत .
शहरांच्या ठिकाणी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दीचे चित्र आहे,मात्र नागरिक फारशी काळजी घेत नसल्याचे चित्र आहे.शनिवारी अंबाजोगाई 1,आष्टी 3,गेवराई 1,माजलगाव 2 आणि पाटोदा येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह आहे.
कोरोना आटोक्यात आला असला तरी काळजी घेण्याची गरज आहे,दिवाळीच्या धामधुमीत नियम न पाळल्यास त्याचा फटका सर्वांना बसू शकतो हर सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.