November 30, 2021

कमजोरी,थकवा,ऍनिमिया दूर करण्यासाठी हे करा !

कमजोरी,थकवा,ऍनिमिया दूर करण्यासाठी हे करा !

बीड- व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते,त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.त्वचा रोग,कमजोरी,थकवा,ऍनिमिया सारखे आजर यामुळे उदभवू शकतात.व्हिटॅमिन सी साठी वैद्यकीय सल्याची गरज असते,योग्य वेळी काळजी घेतल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात .आहारात लिंब,संत्री, ब्रोकली आदींचे सेवन करणे आवश्यक आहे.

केसांपासून हाडांपर्यंत व्हिटॅमिन-सी ची आवश्यकता असते. सी व्हिटॅमिनच्या मोठ्या कमतरतेमुळ एक भयंकर आजार सुद्धा होऊ शकतो. या आजाराबाबत आणि व्हिटॅमिन-सी ची कमतरता भरून काढणार्‍या पदार्थांबाबत जाणून घेवूयात…

स्कर्वी सारखा भयंकर आजार
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन-सी ची मोठी कमतरता होते तेव्हा त्यास स्कर्वी म्हणतात. जसे पायांमध्ये वेदना, दात तुटणे, हिरड्यांमध्ये फोड, अचानक ब्लिडिंग होणे, अ‍ॅनिमिया, थकवा, कमजोरी, गुडघ्यांमध्ये वेदना इत्यादी समस्या होऊ लागतात. इतिहासात अशी अनेक प्रकरणे दिसून आली आहेत ज्यामध्ये स्कर्वीमुळे मृत्यू झाला आहे. मात्र, सध्या याची प्रकरणे खुप कमी आहेत.


व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे होणारे सर्वात सुरुवातीचे लक्षण म्हणजे संपूर्ण दिवस थकवा आणि कमजोरी राहणे आणि मूड खराब राहणे. ही समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन-सी सप्लीमेंट चे सेवन करू शकता.
त्वचेसाठी व्हिटॅमिन सी कोलोजन बनवण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरूण दिसते. तर, या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ड्राय स्किन, डॅमेज स्किन, सुरकुत्या, डाग, ढीली त्वचा इत्यादी समस्या होतात.


जखम भरण्यास उशीर लागणे, दातांची कमजोरी,कमजोर हाडे,दात आणि हिरड्यांमधून रक्त येणे, इम्यून सिस्टम कमजोर होणे,कमजोर केस, रक्ताची कमतरता, इत्यादी.
पुरुषांना रोज 90 एमजी आणि महिलांना रोज 75 एमजी व्हिटॅमिन-सी ची आवश्यकता असते. ज्यासाठी खाली फूड्सचे सेवन करू शकता.
लिंब, संत्रे, ब्रोकली, पपई, पेरू, सिमला मिरची,किवी,लीची, इत्यादी

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *