November 30, 2021

आर्यन चा मुक्काम वाढला !

आर्यन चा मुक्काम वाढला !

मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अन गुरुवारी जामीन मंजूर झालेला शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याची शुक्रवारची रात्र देखील तुरुंगात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे,वेळेत जामीनाची कागदपत्रे न पोहचल्याने आर्यनचा मुक्काम वाढला आहे.

आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेमुळे त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. आता आर्यन खानची उद्या सुटका होणार असल्याची माहिती आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी दिली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निकालाच्या प्रमाणित प्रतीवर एनडीपीएस कोर्ट सुटकेचे आदेश जारी करते. हायकोर्टाच्या आदेशानुसार कैद्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची आणि जमानतीची पूर्तता झाल्यावर हे आदेश जारी केले जातात.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान गेल्या 26 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला होता पण न्यायालयाची प्रत पोहोचली नसल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर आज न्यायालयाने जामीन आदेशाची प्रत जारी केली. त्यामुळे आर्यन खान आज तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा असला तरी त्याची प्रत वेळेत पोहोचला नसल्याने त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जामीनदार म्हणून जुही चावलाने भूमिका बजावली.

आर्यन खान आज तुरुंगातून सुटणार असल्याची बातमी पसरताच आर्थर रोड तुरुंगाबाहेर आणि मन्नत या शाहरुखच्या बंगल्याबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *