बीड – नुकत्याच जाहीर झालेल्या सीईटी च्या निकालानंतर आता लवकरच राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत. यामध्ये विशेषतः इंजिनिअरिंग,फार्मसी, ऍग्री,आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी अशा विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशा संदर्भात योग्य माहिती व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच या ही वर्षी जोशीज मॅथस क्लासेस च्या वतीने इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस सेमिनार चे शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी आयोजन केले आहे.
यामध्ये इंजिनिअरिंग च्या विविध शाखा व त्यामधील संधी यानुसार योग्य शाखेची निवड कशी करावी, तसेच शासकीय, निमशासकीय, स्वायत्त अशा विविध प्रकारच्या महाविद्यालयामधून योग्य ती निवड करताना काय काळजी घ्यावी, प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे, विविध स्कॉलरशिप, शासकीय योजना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी सोबतच इतरही करिअरबद्द्ल माहिती देण्यात येणार आहे. या सेमिनार साठी भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर चे Executive Director तथा ISTE, Delhi च्या वतीने Best Principal म्हणून सन्मानित करण्यात आलेले प्रा. एम.एस. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
हा सेमिनार शनिवार दि 30 ऑक्टोबर रोजी जोशीज मॅथस क्लासेस, उमाकिरण शैक्षणिक संकुल, बीड येथे सकाळी ठीक 11 वाजता असणार आहे. सर्व विद्यार्थी व पालकांसाठी मोफत असलेल्या या सेमिनार साठी इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जोशीज मॅथस क्लासेस चे संचालक प्रा. सुनिल जोशी यांनी केले आहे.